नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) pm yasasvi योजना अंतर्गत शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागवणे सुरु केले आहे. या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रकिया 17 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. ही योजना भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे चालवली जाते. या योजने अंतर्गत प्रती विद्यार्थी प्रतिवर्ष 75000 ते 125000 पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
परीक्षा कोण देऊ शकतो ?
- इतर मागास वर्ग (OBC),आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC),आणि भटक्या जाती आणि जमाती (NT) चे विद्यार्थी.
- इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वीत शिकणारा विद्यार्थी.
परीक्षा स्वरूप
- YASASVI प्रवेश परीक्षा ही OMR पद्धतीने म्हणजेच पेपर पेन मोड वर आधारित असून परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रकारची असून एकूण 100 गुणांची ही परीक्षा असणार आहे.
- वेळ – अडीच तास (150 मिनिटे
- परीक्षेचे माध्यम – हिंदी आणि इंग्रजी
- नकारात्मक गुण नाही.
- विषय खालीलप्रमाणे-
अ. क्र | विषय | प्रश्न संख्या | प्रत्येकी गुण | एकूण गुण |
1 | गणित | 30 | 1 | 30 |
2 | विज्ञान | 25 | 1 | 25 |
3 | सामाजिक शास्त्र | 25 | 1 | 25 |
4 | सामान्य ज्ञान | 20 | 1 | 20 |
एकूण | 100 | 100 |
( परीक्षा इयत्ता 10 वी पर्यंतचा ncert च्या अभ्यासक्रमावर आधरित असेल )
© परीक्षेचा दिनांक – 29/09/2023 ©
© इतर पात्रता ©
- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराने मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश घेतलेला असावा.
- अर्जदार 8 वी किंवा 10 (आवश्यकतेनुसार) उत्तीर्ण असावा.
- अर्जदार इयत्ता 9 वीत शिकत असला तर त्याचा जन्म 01/04/2007 ते 31/03/2011 या दरम्यान झालेला असावा.
- अर्जदार 11 वीत शिकत असेल तर त्याचा जन्म 01/04/2005 ते 31/03/2009 या दरम्यान झालेला असावा.
अर्ज कोठे भराल ?
अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
हिंदीत माहितीपुस्तिका वाचण्यासाठी डाउनलोड बटनावर क्लिक करा.
mimeos xyandanxvurulmus.Gl1BtztUJddP