BED 2023-24 प्रवेश सुरु
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम ( बी.एड ) (P80) प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवणे सुरु केले आहे.
प्रवेश पात्रतेच्या अटी
- महाराष्ट्र सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षाचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- पदवीमध्ये किमान 50 टक्के गुण खुल्या प्रवर्गासाठी तर , किमान 45 टक्के गुण राखीव प्रवर्गासाठी असणे आवश्यक आहे.
- डीएड, डी.टी.एड, क्राफ्ट टीचर पूर्ण केलेले उमेदवार.
अर्ज करण्याची पद्धत
प्रवेश अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज स्वीकारले जातील.
प्रवेश प्रक्रिया शुल्क
- खुला प्रवर्ग – 1000 रुपये.
- मागास प्रवर्ग – 500 रुपये.
कालावधी
या शिक्षणक्रमाचा कालावधी किमान दोन आणि कमाल पाच वर्षाचा आहे. कमाल पाच वर्षात कोर्स पूर्ण न केल्यास मुदत संपल्याच्या दिवसापासून पुन्हा पाच वर्षासाठी त्या वर्षाच्या तुकडीचे संपूर्ण शुल्क भरून पुननोंदणी करता येईल.
एकूण श्रेयांक
हा शिक्षणक्रम 120 श्रेयांकाचा म्हणजेच सुमारे 3600 अध्ययन तासांचा आहे. ( एक श्रेयांक म्हणजे 30 ते 35 तासांचा अभ्यासक्रम होय.)
शिक्षणक्रम माध्यम
बीएड शिक्षक्रमाचे माध्यम मराठी आहे. या शिक्षणक्रमाचे स्वयं अध्ययन साहित्य मराठीत आहे.
जिल्हानिहाय जागा
NCTE ने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील बीएड शिक्षणक्रमाला एकूण 1500 जागांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला 42 / 43 भरण्यात येतात. शासन निर्णयानुसार 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील.
निवड प्रक्रिया
सदर शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी तयार करताना केवळ ऑनलाइन संगणकीय अर्जात भरलेल्या माहितीचा विचार केला जातो आणि त्यानुसारच गुण देऊन निवड यादी तयार केली जाते. सदरील गुण खालीलप्रमाणे देण्यात येतात.
- अनुभव – प्रत्येक वर्षासाठी एक गुण
- पदवी – विशेष प्राविण्य O श्रेणी 6 गुण, प्रथम श्रेणी 5 गुण, द्वितीय श्रेणी 4 गुण,
- पदव्युत्तर पदवी – प्रथम श्रेणी 5 गुण, द्वितीय श्रेणी 4 गुण, तृतीय श्रेणी 3 गुण.
- अतिरिक्त एक वर्षाची पदविका – प्रथम श्रेणी 5 गुण, द्वितीय श्रेणी 4 गुण, तृतीय श्रेणी 3 गुण.
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापाठाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर प्रमाणपत्र शिक्षणक्रम ( किमान सहा महिने) 2 गुण, पदविका शिक्षणक्रम 3 गुण, पदवी शिक्षणक्रम 4 गुण, पदव्युत्तर पदवी 5 गुण, आणि संशोधन शिक्षणक्रम 6 गुण असे अतिरिक्त गुण दिले जातील.
संपर्क सत्रे
- प्रथम वर्ष – 35 दिवस
- द्वितीय वर्ष – 35 दिवस
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा. (P80) निवडा.
https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=28417
अर्ज कसा भरायचा, विषय कोणते घ्यावेत, अंतिम शुल्क व इतर आणखी तपशीलवार माहितीसाठी PROSPECTS डाउनलोड करा.
ultrafast xyandanxvurulmus.fME1GTvekkdY