15 AUGAST SPEECH

१५ ऑगस्ट

 

15 AUGAST SPEECH

१५ ऑगस्ट भाषण मराठी

भाषण १

सर्वांना नमस्कार तिरंगा झेंडा फडकतो जयजयकार बोला. १५ ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला. आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान मान्यवर गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आज १५ ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा सन्मानाचा तसेच उत्साहाचा दिवस आहे. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आसू न हो तो आखे कीस काम कि दिल न हो तो धडकन किस काम की अगर हम वतन के काम न आये तो जिंदगी किस काम की भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र मिळाले. त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रातिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. भारत हा देश इंग्रजांच्या गुलामगिरित होता. इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले.आजच्या दिवशी आपण आपल्या शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो. भगतसिंग, महात्मा गांधी, मंगल पांडे, पंडित जवाहरलाल नेहरू, सुखदेव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा हजारो नेते, क्रातीकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले.त्यांच्या बलिदानामुळे आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे. आपल्या देशाला थोर महापुरुष, स्वातंत्र्य सेनानी लाभले त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरित होऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. इस दिन के लिए वीरो ने अपना खून बहाया है झूम उठो देशवाशियो आज स्वतंत्रता दिवस आया है आपापसातील वैर सोडून सर्व भारतीय एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. जय हिंद जय महाराष्ट्र

भाषण २  15 AUGAST SPEECH

१५ ऑगस्ट भाषण मराठी

नमस्कार आज १५ ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन, आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित जमलो आहोत. तिरंगा ही आन है तिरंगा ही शान है और तिरंगा ही हम हिंदुस्तानी कि पहचान है सुमारे २०० वर्षापूर्वी इंग्रज भारतात आले होते. आणि एखाद्या शेताला जशी कीड लागते तशी व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवला आणि कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण दीडशे वर्षे भरडत राहिलो.अतोनात अत्याचार, असह्य वेदना सहन केल्या.आपल्याच देशात परके म्हणून किती दिवस राहायचे ? सोन्यचा धूर निघत असलेल्या देशाला असं उघड्या डोळ्यांनी तुटताना किती दिवस बघायचं ? असा प्रश्न भारतमातेच्या लेकरांना नसता तर नवलंच ? तरीही आज भारतासमोर महागाई, भष्टाचार, गरिबी, गुन्हेगारी सारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत.या समस्यांचे उच्चाटन झाल्याशिवाय देश सुखी समाधानी होणार नाही. चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. म्हणून शेवटी म्हनावेसे वाटते कि तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू ……. प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू भारत माता कि जय. जय हिंद जय महाराष्ट्र

भाषण ३   15 AUGAST SPEECH

उत्सव तीन रंगाचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी भारत देश घडविला.
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन व येथे उपस्थित माझ्या देश बाधावांनो आज १५ ऑगस्ट आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा ७७ व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.
सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता.आपल्या भारताला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही.
न पुछो जमानेसे कि
क्या हमारी कहाणी है
हमारी पहचान तो यही है
कि हम सब हिंदुस्तानी है
स्वातंत्र्यासाठी अनेक संघर्ष, आंदोलने आणि वेळ प्रसंगी बलिदान सूद्धा आपल्या देशभक्तांना द्यावे लागले.या सर्वांचे आपण सदैव स्मरण केले पाहिजे. आज आपल्या स्वतंत्र भारताचे रक्षण करण्यासाठी सैनिक दिवसरात्र सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. त्या सर्व सैनिकांना माझा मनाचा मुजरा.या मंगलदिनी आपण सर्वांनी एकच संकल्प केला पाहिजे तो म्हणजे आपल्या भारत देशाचा सर्वांगीण विकास.
जय हिंद जय भारत

भाषण ४   15 AUGAST SPEECH

भारतमाता तेरी गाथा
सबसे उची तेरी शान
तेरे आगे शिष झुकाये
दे तुझको हम सब सम्मान
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पहिला.ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या विरांमुळे हा देश अखंड राहिला.
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय गुरुजनवर्ग, आणि येथे जमलेल्या माझ्या देश बांधवांनो आज १५ ऑगस्ट आणि आज आपण येथे स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. सर्वप्रथम मंगलमय दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच मला माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल माझ्या गुरुजनवर्गाचे मनापासून आभार.
१५ ऑगस्ट १९४७ हाच तो दिवस होता जेव्हा आपल्या देशाला ब्रिटीशांच्या २०० वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले.ब्रिटीश राजवटीत जनतेवर अतोनात अत्याचार झाले.क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र्य करण्यात मोलाचे योगदान दिले.या सर्व क्रांतीकारकांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना मनाचा मुजरा.
माझ्या बालमित्रांनो १५ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी येतो आणि आपण स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र राहू ही भावना हृदयात आणि मनात जागृत होते. आजच्या या पवित्र दिवशी राष्ट्रध्वजाला वंदन करूया आणि राष्ट्राच्या कल्याणाचा संकल्प करूया.देशाच्या विकासासोबतच देशाची सुरक्षा आणि देशावाशियांच्या कल्याणासाठी सदैव समर्पित राहण्याची शपथ घेऊया.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय हिंद जय भारत

भाषण ५   15 AUGAST SPEECH

अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला 15 ऑगस्टनिमित्त जे काही सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे हि नम्र विनंती आजच्याच दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले.माझा भारत देश खूप महान आहे.आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात.आपल्या देशात अनेक राज्ये आहेत. गंगा, गोदावरी, पूर्णा, कावेरी, नर्मदा अश्या अनेक नद्या आहेत. अनेक धर्माचे हिंदू, मुस्लीम, सिख, इसाई,जैन अशा अनेक प्रकारचे लोक राहतात. इतकी सारी विविधता असूनही माझ्या भारत देशात एकता आहे म्हणूनच माझा भारत देश महान आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एवडे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद, जय भारत.

 

भाषण ६   15 AUGAST SPEECH

अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला 15 ऑगस्टनिमित्त जे काही सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे हि नम्र विनंती. माझ्या भारत देशाचा आज स्वातंत्र्य दिन आहे. पूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते.पण लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू,भगत सिंग अशा अनेक वीरांनी आपले बलिदान दिले व आपला देश स्वातंत्र्य झाला. १५ ऑगस्ट  हा आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि तो आपण अतिशय आनंदाने साजरा करतो. एव्हडे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद जय भारत.

 

भाषण ७   15 AUGAST SPEECH

अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला 15 ऑगस्टनिमित्त जे काही सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे हि नम्र विनंती. आज मी तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले बलिदान दिलेल्या छोट्या शिरीस कुमार बद्दल माहिती सांगणार आहे. हिम्मत असेल तर माझ्यावर गोळी चालवा असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या शिरीषकुमारचा  जन्म नंदुरबार जिल्ह्यात झाला. महात्मा गांधी यांनी चले जाव चा नारा दिला आणि संपूर्ण भारतात मोर्चे निघाले प्रभात फेऱ्या निघाल्या. अशाच एका प्रभात फेरीत आठवीत शिकणारा शिरीष कुमार आणि त्याचे पाच मित्र सामील झाले आणि भारत माता कि जय, वंदे मातरम अशा घोषणा देऊ लागले. पोलिसांनी त्यांना अडवले आणि घोषणा देण्याचे बंद करा म्हणून सांगितले पण हे वीर बालके डगमगले नाही आणि आणखी जोशात ते घोषणा देऊ लागले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि यातच शिरीष कुमार आणि त्याच्या पाच मित्रांना वीरमरण आले. धन्य तो शिरीष कुमार आणि धन्य त्याचे जीवाला जीव देणारे मित्र. एव्हडे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद जय भारत.

 

 

  • सर्व भाषणे pdf मध्ये downlod करण्यासाठी downlod बटनावर क्लिक करा.

 

आणखी वाचासावित्रीबाई फुले

आणखी वाचा साने गुरुजी 

By rpcgurueducation.com

HI I AM TEACHER AND I PROVIED SOME EDUCATIONAL INFORMATION

3 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *