इस्राईल सेना किती शक्तिशाली ?
सध्या इस्राईल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूने तुफान मिसाईल आणि बॉम्ब चा वर्षाव होत आहे. हमासला संपवण्यासाठी इस्राईलने आपली सेना जि कि जगामध्ये अव्वल दर्जाची मानली जाते युद्धात उतरली आहे. त्याचबरोबर इस्राईल सरकारने आपले राखीव तीन लाख सैनिकांना सुद्धा कामावर परत बोलावले आहे. इस्राईल सेना हमासचे मित्र असणाऱ्या देशांना सुद्धा धूळ चारू शकते असे मानले जाते.
स्थापना :
इस्राईल सेनेला इसरायल डिफेन्स फोर्स (IDF) या नावाने ओळखले जाते. याची स्थापना इस्राईल देशाची स्वातंत्र झाल्याची घोषणेच्या ठीक दोन आठवड्यानंतर म्हणजेच 31 में 1948 मध्ये करण्यात आली. IDF चा प्राथमिक तत्व आहे कि इस्राईल देश एकही युद्ध हारू शकत नाही.
प्रकार :
इसरायल डिफेन्स फोर्स (IDF) चे तीन प्रकार आहेत इसरायली ग्राउंड फोर्स, इसरायली वायू सेना आणि इसरायली नौसेना.
संख्याबळ :
इसरायली सेना एकूण 1 लाख 76 हजार सक्रीय सैनिक असून राखीव सैनिकांची संख्या 4 लाख च्या आसपास आहे. यामध्ये स्थलसेना, वायुसेना आणि नौसेना यांचा समावेश आहे. मेजर जनरल योयल स्ट्रीक हे सध्याचे इसरायली ग्राउंड फोर्स चे प्रमुख आहेत.
युद्धे :
इसरायली ग्राउंड फोर्सने आत्तापर्यंतच्या सर्व प्रमुख युद्धामध्ये भाग घेतला आहे. त्यामध्ये अरब -इस्राईल युद्ध, 1956 मधील स्वेज संकट आणि 1967 मधील सहा दिवशीय युद्ध आणि आताचे हमास – इस्राईल युद्ध तसेच लेबनॉन युद्ध यांचा समावेश आहे.
प्रमुख हत्यारे :
इसरायली ग्राउंड फोर्स हे प्रामुख्याने स्वदेशी बनावटीचे विकसीत केलेले हत्यारांचा वापर करतात. तसेच त्यांचे आयरन डोम मिसाईल रक्षा प्रणाली ही पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जे शत्रू राष्ट्राचे क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करू शकतात.
वायू सेना :
इसरायली वायू सेनेत जवळजवळ 690 च्या आसपास लडाकू विमाने आहेत. त्यामाध्ये ए-4, स्काईहॉक, F-4 फॅन्टम,F-15 ईगल F-16 फायटिंग फाल्कन आणि F-35 लायात्निंग यांचा समावेश आहे.यातील बहुतांश विमाने ही अमेरिकेत बनली आहेत.
नौसेना :
इसरायली नौसेनेत आजरोजी 9 हजार च्या आसपास सक्रीय सैनिक असून दहा हजाराच्या आसपास राखीव सैनिक आहेत. इसरायली नौसेनेत सात कार्बेट जहाज, आठ मिसाईल क्षेपणास्त्रे जहाज पाच पाणबुड्या तसेच गस्ती घालणारे छोटे जहाज आणि दोन सहायक जहाज आहेत.
हे सुद्धा वाचा : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
analyticities xyandanxvurulmus.PUEclKTTWH4c