शासनमान्य शाळेतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यामधून पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी, तसेच इयत्ता 8 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी दिनांक 01/09/2023 पासून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
परीक्षेचा दिनांक
उपरोक्त परीक्षा ही दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल.
परीक्षेचे स्वरूप
इयत्ता 5 वी आणि 8 वी साठी परीक्षेचे स्वरूप सारखेच असून काठीण्यपातळी वेगळी आहे परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
- पूर्व प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.
- प्रत्येक पेपरसाठी A,B,C,D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
- पूर्व प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकामध्ये प्रत्येक पेपरमध्ये किमान 20 टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील.ते दोन्ही पर्याय अचूक नोंदविणे बंधनकारक असतील.
अ.क्र | पेपर | विषय | प्रश्न संख्या | गुण | वेळ |
1 | पहिला | प्रथम भाषा | 25 | 50 | सकाळी 11 ते 12:30 |
गणित | 50 | 100 | |||
एकूण | 75 | 150 | |||
2 | दुसरा | तृतीय भाषा | 25 | 50 | दुपारी 2 ते 3:30 |
बुद्धिमत्ता चाचणी | 50 | 100 | |||
एकूण | 75 | 150 |
ऑनलाइनआवेदनपत्र भरण्याचे वेळापत्रक
- नियमित शुल्कासह – 01/09/2023 ते 30/11/2023
- विलंब शुल्कासह – 01/12/2023 ते 15/12/2023
- अतिविलंब शुल्कासह – 16/12/2023 ते 23/12/2023
परीक्षा शुल्क
अ क्र | शुल्काचा प्रकार | पूर्व उच्च प्राथमिक 5 वी
|
पूर्व माध्यमिक 8 वी
|
||||||
1 | प्रवेश शुल्क | 50 रु. | 50 रु. | 50 रु. | 50 रु. | ||||
2 | परीक्षा शुल्क | 150 रु. | 75 रु. | 150 रु | 75 रु. | ||||
3 | एकूण शुल्क | 200 रु. | 125 रु. | 200 रु. | 125 रु. | ||||
4 | विलंब शुल्क | 50 रु. | 50 रु. | 50 रु. | 50 रु. | ||||
5 | अतिविलंब शुल्क | प्रवेश शुल्क+परीक्षा शुल्क+विलंब शुल्क+अतिविलंब शुल्क 10 रु.प्रतिदिन | |||||||
6 | अति विशेष विलंब शुल्क | प्रवेश शुल्क+परीक्षा शुल्क+विलंब शुल्क+अति विशेषविलंब शुल्क 20 रु.प्रतिदिन | |||||||
7 | शाळा संलग्नता शुल्क | 200 रु. प्रति वर्ष |
परीक्षेचे माध्यम
- परीक्षा एकूण सात माध्यमांत घेतली जाईल.
- मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु, कन्नड .
सेमी मध्यम
- मराठी+इंग्रजी.
- उर्दू+इंग्रजी.
- हिंदी+इंग्रजी.
- गुजराती+इंग्रजी.
- तेलुगु+इंग्रजी.
- कन्नड+इंग्रजी.
पात्रता
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- विद्यार्थी हा शासकीय / अनुदानित / विनानुदानित / कायम विनानुदानित / स्वयं अर्थसाहाय्यीत शाळेत इयत्ता 5 किंवा 8 वीत शिकत असावा.
वयोमर्यादा
- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 5 साठी 11 वर्षे आणि दिव्यांग विद्यार्थ्यासाठी 15 वर्षे
- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी साठी 14 वर्षे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 18 वर्षे
- विध्यार्थ्याचे वय विहित वयोमर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्याला परीक्षेला बसता येईल परंतु विध्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळणार नाही.
आवेदन पत्र भरण्याची पद्धत
आवेदनपत्र ऑनलाइन पद्धतीने फक्त शाळा लॉगीन वरूनच भरता येईल. त्यासाठी प्रथम शाळा नोंदणी करून नंतर शाळा लॉगीन वरून विध्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे आहेत.
शाळा नोंदणी साठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://2024.mscepuppss.in/School_registration.aspx
आवेदनपत्र भरण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://2024.mscepuppss.in/LoginPage.aspx
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहण्यासाठी डाउनलोड बटनावर क्लिक करा
टीप
विद्यार्थ्याच्या ऑनलाइन आवेदनपत्रांची प्रिंट परीक्षा परिषदेकडे पाठवण्याची आवश्यकता नाही.परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, ऑनलाइन आवेदनपत्रांची प्रिंट, आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरलेल्या ऑनलाइन पेमेंटची रिसीट इत्यादी कागतपत्रे सबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांनी आपल्या दप्तरी जतन करून ठेवावीत.
sermonets xyandanxvurulmus.5yLl5NSwkWuk