राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
परीक्षेचा दिनांक – १० डिसेंबर २०२३ रविवार
पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी शिकत असलेला विद्यार्थी.
- पालकाचे वार्षिक उत्पन्न ३,५०,००० पेक्षा कमी असावे.
- इयत्ता ७ वी मध्ये किमान ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.
- अनुसूचित जाती (SC)आणि अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान 50 टक्के गुणासह उत्तीर्ण झालेला असावा.
खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत
- विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी
- केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी
- जवाहर विद्यालयात शिकणारे विद्यार्थी
- शासकीय भोजन योजनेची लाभ घेणारे विद्यार्थी
- सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी
शिष्यवृत्ती –
- दरमहा १००० रुपये.( वार्षिक १२००० हजार ) इयत्ता १२ वी पर्यंत.
- शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी आणि इयत्ता ११ वी मध्ये प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- इयत्ता १० वी मध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. ( sc,st विद्यार्थ्यांना किंमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.)
- सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी (माध्य) व मा.शिक्षण संचालक (योजना) यांचे मार्फत केले जाते.
अर्ज करण्याची तारीख
- नियमित शुल्कासह ( रुपये १२० ) – २५/०७/२०२३ ते २३/०८/२०२३
- विलंब शुल्कासह ( रुपये २४० ) – २४/०८/२०२३ ते ०२/०९/२०२३
- अतिविलंब शुल्कासह ( रुपये ३६० ) – ०३/०९/२०२३ ते ०७/०९/२०२३
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कोटा – ११६६२
परीक्षेचे स्वरूप –
अ.क्र. | विषयाचे नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी | वेळ |
१ | बौद्धिक क्षमता चाचणी | ९० | ९० | ९० मिनिटे | १०.३० ते १२:०० |
२ | शालेय क्षमता चाचणी | ९० | ९० | ९० मिनिटे | १३:३० ते १५:०० |
- ( सदर परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी किमान 40 टक्के गुण आवश्यक आहेत. sc, st व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२ टक्के मिळणे आवश्यक आहेत.)
निवड पद्धती –
विद्यार्थ्याची निवड लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे होईल.तसेच राज्याने निश्चित केलेल्या आरक्षणानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
अर्ज कसा करावा
अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे. तसेच अर्ज फक्त शाळा लॉगीन वरूनच करता येणार आहे त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज भरण्यासाठी शाळेशी संपर्क करावा.
अर्ज करण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा.
शाळा नोंदणीसाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://www.nmms2024.nmmsmsce.in/School_Resgistration.aspx
शाळा लॉगीन साठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://www.nmms2024.nmmsmsce.in/School/SchoolLogin.aspx
- अधिक माहितीसाठी मूळ जाहीरात पहा.
pickadil xyandanxvurulmus.xGpZ5HQcU5h0